सोलापूर येथील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष फारूख अहमद यांनी दिले.
फारूख अहमद पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही कुठे लपला होतात? त्यावेळी आम्हीच लढत होतो, असेही सांगितले.
पुढे बोलताना फारूख अहमद म्हणाले, काँग्रेस पक्षाने दलित आमदारांना वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्यापूरते सोडले आहे. जेव्हा देशभर अल्पसंख्याकांवर अन्याय होत होते, तेव्हा तुमचे वडील सुशीलकुमार शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर होते, असा टोलाही लगावला.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आपण किती कोटी रुपयांची संपत्ती दक्षिण आफ्रिका येथे गुंतवली आहे? याचा हिशोब देणार आहात का? यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना भान राखून बोलायचे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिला.