आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे काम सध्या भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच राज्यातील आणखी काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोराची राज्यातील राजकिय वर्तुळात सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून राज्यातील २५२ विधानसभा मतदारसंघ आणि ४८ लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत आणि गळती रोखण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील २५२ विधानसभा मतदारसंघात २५२ निरिक्षकांची नियुक्त्या करण्यात आली माहिती काँग्रेसने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात ९ तालुके असून या अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्त्येही भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर येथील प्रत्येक मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्ये आणि मतदारांना काँग्रेससोबत रोखण्यासाठी गिरिश नेमानीकर, राजेश फुलारे, बाळासाहेब रावणगांवकर, सुरेंद्र घोडाजकर, श्रीनिवास मोरे, संजय भोसीकर, संजय शेळगांवकर, माधवराव मिसाळे, दिलीप व्यंकटराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर लातूर जिल्ह्यात शहरासह स्व.विलासराव देशमुख यांचे दोन्ही बंधु अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे ही काँग्रेससोडून भआजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा लातूरसह राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनुप शेळके, सर्जेराव मोरे, विक्रांत गोजमगुंडे, रविंद्र काळे, दीपक सुळ, समद पटेल आदींकडे तालुकानिहाय निरिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शहरासाठी ११ तालुक्यांसाठी सुलेमान तांबोळी, राहुल पाटील, मुन्नाभाई हरनमारे, भिमाशंकर जमादार, विनोद भोसले-सुधीर लांडे, मनिष गदादे, राधाकृष्ण पाटील, गणेश डोंगरे-प्रशांत साले, रमेश हसापूरे, अण्णासाहेब इनामदार, अभिषेक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर जास्तीत जास्त निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर मतदारसंघनिहाय काँग्रेसच्या निरिक्षकांची यादी पुढील प्रमाणे…..