Breaking News

शिवसेनेच्या रस्त्यावरच्या इतिहासाला पुस्तक रूप देणारे मनोहर जोशी अनंतात विलिन

शिवसेनेची स्थापना ते १९९३ साली महाराष्ट्राच्या सत्तास्थानी विराजमान होत शिवसेना-भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री ते शिवसेनेचे पहिलेच लोकसभाध्यक्ष ठरलेले मनोहर जोशी यांनी वयाच्या ८६ व्या हिंदूजा रूग्णालयात वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामाते अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंड राहिले आहेत.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांच्या यादीत मनोहर जोशी यांचे स्थान खूप वरचे होते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वसनीय नेत्यांमध्ये मनोहर जोशी यांची गणना होत होती. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील असल्यानेच राज्यातील शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर त्यानंतर स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लोकसभेचे अध्यक्षपदही भूषविले.

तसेच शिवसेना राजकिय पक्षाच्या जन्माचा इतिहास आणि त्यांच्या पक्ष संघटना वाढीचा इतिहास हा २००० सालापर्यंत फक्त कर्णोपर्णीच होता. परंतु शिवसेनेचा १९६८ सालापासूनचा इतिहास कागदोपत्री नोंदविला तो मनोहर जोशी यांनी. लोकसभाध्यक्ष म्हणून कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून पी.एचडी अर्थात डॉक्टरेटसाठी शिवसेना राजकिय पक्षाचा इतिहास निवडला. या इतिहास रूपी शिवसेना पक्षाला कागदोपत्री जिवंतपणा आणला तो मनोहर जोशी.

शिवसेनेचे धोरणे पाहून आपल्या शिक्षकी पेक्षा राजीनामा मनोहर जोशी यांनी दिला होता. त्यामुळे शिक्षकी पेक्षातील सर हे राजकारणातील आणि शिवसैनिकांचे सर म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात वयोमानानुसार आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मनोहर जोशी यांचे मातोश्रीवरील महत्व कमी झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यात विसंवाद निर्माण झाला. परंतु इतके सगळं होऊनही मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांची पाठ कधी सोडली नाही.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मनोहर जोशी यांच्या अत्यंदर्शनासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *