Breaking News
Chhagan Bhujbal Sharad Pawar

छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, माणूसकी विसरलो असतो तर पवारांची भेट घेतली नसली बीड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दिले प्रत्युत्तर

आम्ही माणुसकी विसरलो असतो तर शरद पवारा ( Sharad Pawar ) यांच्या भेटीला आणि आशिर्वाद मागायला गेलोच नसतो असे प्रत्युत्तरच राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

बीड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माणुसकी विसरले तर जनता धडा शिकवेल असे वक्तव्य केले होते, यावर भुजबळ बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या कानात जेल चे वातावरण काय असते असे मेळाव्यात सांगितले होते. यावर भाष्य करतांना छगन  भुजबळ म्हणाले की, जेल चे वातावरण कसे असते ते सर्वांना माहीत असते. त्यामुळे मला कोणाच्या मनात भीती घालायचे कारण नाही.

सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेताना ५४ आमदार उपस्थित होते. हा सर्वाचा निर्णय होता. पवार साहेब ( Sharad Pawar ) यांच्या व्यासपीठावर जे आमदार आहेत त्यांचेही हेच मत होते आणि तश्या त्याच्या सह्या ही असून राज ठाकरे यांचा समज आहे तो चुकीचा असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे बदला बाबत माध्यमा मध्ये चर्चा असून आमच्यात अशी कोणतीही चर्चा नाही. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार हे चांगले निर्णय घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

एकिकडे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, दुसरीकडे बंडखोर अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांनी दुस-यांदा शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या भेटीचे तर्क- वितर्क लढवले जात आहेत. मात्र शरद पवार हे आमचे नेते आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे अजित पवार गटाकडून सांगितलं जातयं.

त्यामुळे अजित पवार गटाला नेमकं कोणते आशीर्वाद हवयं याविषयी चर्चा रंगली असून, या भेटीतून अजित पवार गटाकडून आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोललं जातय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार गट विरूध्द शरद पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे.

मात्र अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी काल (रविवार १६ जूलै ) शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (सोमवार १७ जूलै) पुन्हा एकदा अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे पून्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *