Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार मुळेच राष्ट्रवादीचा सर्वोदय … आता सुर्यास्त झालाय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमी कधी महायुतीत बेबनाव आहे तर आता अजित पवार यांना डावलले जात असल्याच्या चर्चेला जोर वाढला आहे. यापार्शवभूमीवर सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत काही जण अस्वस्थ आहेत, अजित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीचा सुर्यादय झाला होता. मात्र आता ते राष्ट्रवादीत नसल्याने उर्वरित राष्ट्रवादीचा सुर्यास्त झाला आहे. त्यामुळे अशा पध्दतीच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच करण्यात येत असल्याची टीका केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आणखी १० आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार आहे, असाही दावा केला. मात्र हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘महाविजय-२०२४’ अभियाना अंतर्गत ‘घरघर चलो’ यात्रेची सुरुवात नगर शहरातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रशेखर बानकुळे म्हणाले की, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना कधीच कोणी डावलू शकत नाही. परंतु महायुतीत ते सहभागी झाल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच अशी वक्तव्य केली जात आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी मोठे स्थान निर्माण केले होते. आता ते वगळून राष्ट्रवादीमध्ये अंधःकार निर्माण झाला आहे, असा आरोपही केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत बोलताना म्हणाले, त्याची आवश्यकता नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. विधानसभेच्या परंपरा, पद्धती व निकालाचे पालन करून ते योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे बी प्लॅनची आवश्यकता नाही. सरकार इतके भक्कम आहे की २२५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला काही अडचण नाही. याशिवाय रोज अनेकजण पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करतात. १० आमदारांची यादी आजच तयार आहे, असा दावाही केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमची महायुती आहे. ही युती सन्मानजनक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’मध्ये १३ घटक पक्ष आहेत, त्या सर्वांचा सन्मान ठेवला जाणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधात भाष्य करतात, दुसरीकडे आता शरद पवार व अदानी यांची भेट झाली. याप्रश्नी बोलताना बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीची भूमिका रोज बदलत आहे. ‘इंडिया’मधील उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदुधर्म हद्दपार करण्याची, संपवण्याची भाषा केली. त्याबद्दल राहुल गांधी यांची काय भूमिका आहे, हे प्रथम जाहीर करावे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही, ते केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या रक्तातच कर्करोग आहे, राहुल गांधी यांनी आधी उदयनिधी यांच्या भूमिकेबद्दल उत्तर द्यावे अशी मागणीही केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *