Breaking News

अखेर ठरलं पुण्यातली अयोध्येपूर्वीची ‘राज गर्जना’ रविवारी सकाळी होणार २२ तारखेला सभागृहात सभेचे आयोजन

नियोजित अयोध्या दौऱ्यापूर्वी पुणे येथे जाहिर सभा घेण्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली. मात्र सध्या पुणे दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतले. त्यामुळे मनसेची २१ मेची सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येवू लागले. परंतु काही वेळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी २२ मे गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते. मंगळवारी रात्री अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली. मात्र, अचानक ठाकरे यांना पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतले. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
दरम्यान, याआधी याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडभरात होणार असल्याचं स्पष्ट केले होते. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले, राज ठाकरे यांच्या सभेसाठी डेक्कन येथील नदी पात्रातील जागा मिळावी, याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र हवामान विभागाने २३ तारखे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचं काम देखील सुरू आहे. अशात जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही नदी पात्रातील ठिकाण रद्द केलं असून आम्हाला अन्य तीन ठिकाणांची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणाबाबत राज ठाकरे उद्या स्वतः जाहीर करतील. या आठवड्याच्या शेवटी ही सभा होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द होणार नाही.
त्यामुळे मनसेची सभा आता मोकळ्या मैदानात नाही तर सभागृहात तीही सकाळी १० वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *