Breaking News

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आधी फोडाफोडीचे…..आता थेट पक्षच पळवला जातोय… पोहरादेवी शपथ बंद दाराआड अमित शाहबरोबरील चर्चेत अडीच अडीच वर्षेच ठरली

शिवसेनेतील फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता सुरुवात केली. तसेच या प्रक्रियेत बंडखोर गटाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली. यापार्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले असून यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर जोरदार हल्ला चढवित म्हणाले, मी युतीतून बाहेर पडलो नाही तर मला भाजपाने युतीतून बाहेर ढकललं, असा गंभीर आरोप केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन मी जाहीरपणे आधीच सांगितलं आहे. अमित शाह आणि माझ्यात बंद दाराआड काय घडलं ते सांगितलं आहे. आज मी पोहरादेवीला आलोय. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. ते वचन शाह यांनी पाळलं असतं तर आज कदाचित भाजपा किंवा शिवसेनाच मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज भाजपाला इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. तसेच भाजपाच्या जुन्या, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्याांना बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती, असा खोचक टोलाही लगावला.

काही झालं तरी आम्ही आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. त्यांना आमच्यासोबतच ठेवू, असं भाजपाने शरद पवार यांना सांगितलं होतं. तशी कबुलीच अजित पवार यांनी दिली. त्यामुळे मित्र ओळखण्यात तुमची चूक झालीय असं वाटतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर देताना म्हणाले, मी चूक केली म्हणत नाही. मैत्री केलीच होती. पण युतीत जे ठरलं ते नाकारलं आणि मला युतीच्या बाहेर ढकललं. आता जी शिवसेना फोडली ते मैत्रीचं लक्षण असू शकतं का? असा सवालही भाजपाला केला.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आला असण्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले, जसं दिसतं तसं बघतो. आणखी वेगळं कसं बघायचं? शिवसेना फोडण्यात आली. पूर्वी एक होतं, राजकारणात फोडाफोडी होत होती. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवूनही जनतेच्या मनात प्रतिसाद आहे. त्याचं प्रत्यंतर सभेत पाहायला मिळालं. लोकं भेटत आहेत. जे घडलं ते चुकीचं आहे असं सांगत आहेत. आम्हाला पाठबळ देत आहे. आशीर्वाद देत आहेत, असंही स्पष्ट केले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *