Breaking News

टीकेची झोड उठल्यानंतर अखेर भाजपा प्रदेशाध्यक्षांची सारवा सारव, तो व्हिडिओ अर्धवट… जागा वाटपावरून केलेल्या विधानावरून घुमजाव

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून कधीही अंतिम निकाल येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात जाण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील २८८ पैकी २८८ जागा लढण्याची तयारी भाजपाने केली आहे. मात्र सध्या शिंदे गटाची शिवसेना भाजपासोबत असून शिंदे गटासोबत असलेल्या ४८ जणांसाठी जागा सोडण्यात येणार असून उर्वरीत २४० जागा लढविणार असल्याचा एक व्हिडिओ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडिओवरून राजकिय टीकेला सुरुवात होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता सारवा सारव सुरु केली.

जागा वाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसून केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र जी चित्रफीत दाखविली जात आहे त्यात अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजपा मिळून २८८ जागा लढणार असून त्यात एनडीएच्या सर्व घटक पक्षाचा समावेश राहणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना भाजपा आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष मिळून २८८ मतदार संघात भारतीय जनता पक्ष प्रचंड काम करत आहे. भारतीय जनता पक्ष जेवढी तयारी करेल तेवढी ती शिवसेनेच्या कामात येईल आणि शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपाच्या कामी येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही आमदार व पदाधिकारी लवकरत शिंदे गटात प्रवेश करतील असा दावाही बावनकुळे यांनी केला.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुरूप आपल्या देवाची पूजा करतात. काही ठिकाणी तर जहरी कार्यक्रम होतात. तिथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले का बोलत नाही? हिंदू विचारांनाच का विरोध करतात? काही गोष्टी चुकीच्या असतील तर दुरुस्त करता येतील पण कार्यक्रमच होणार नाही म्हणजे ही काय मोगलशाही आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील धीरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला भाजपा समर्थन देईल असेही स्पष्ट केले.

त्या व्हिडीओत चंद्रशेखर बावनकुळे नेमके काय म्हणाले?

पक्षाचे प्रवक्ते, समाज माध्यमे आणि प्रसिध्दीमाध्यमे पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना बावनकुळे यांनी भाजपा २४० जागा लढविणार असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत निवडणूक तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या. शिंदे गटाकडे ५० हून अधिक आमदार नसल्याने त्याहून अधिक जागा लढण्यास माणसेच नाहीत, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. त्यांचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते. भाजपा २४० जागा लढणार असल्याने शिंदे गटाला ४८ जागाच मिळतील, असा वक्तव्याचा अर्थ काढला गेला आणि शिंदे गटाकडूनही भाजपा नेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. जागावाटपाच्या अंतिम चर्चा झाल्या नसताना अकारण त्याचे सूत्र खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच जाहीर केल्याने ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली. त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याने युतीतील जागावाटप झालेच नसल्याची सारवासारव बावनकुळेंना रात्रीच करावी लागली.

आम्ही २४० मतदारसंघात तयारी केली, तरी जागावाटपात शिंदे गटाला ज्या अधिकच्या जागा मिळतील, तेथे त्यांना आमच्या तयारीचा उपयोग होईल, असे बावनकुळे यांनी नमूद केले. वास्तविक भाजपा शिंदे गटाबरोबर निवडणुका युतीत लढणार असला, तरी २८८ मतदारसंघात पक्षपातळीवर निवडणूक तयारी करीत असल्याचे आधीच जाहीर झाले आहे. पण तरीही बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण केले. त्यांचे भाषण समाज माध्यमांवरून काढून टाकण्याच्या सूचना ज्येष्ठ नेत्यांनी दिल्या आणि रात्रीच ते तातडीने काढले गेले.

भाजपा २०० हून अधिक जागा लढविणार असून शिंदे गटाला ६०-७० जागांपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. मनसेशी युती करण्याचे भाजपाने ठरविले असले तरी ही युती थेट भाजपाशी न होता, शिंदे गटामार्फत होईल व त्यांच्या कोट्यातून काही जागा दिल्या जातील. मात्र कोणत्या व किती जागा शिंदे गटाला द्यायच्या हे अंतिम झाले नसताना आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असताना बावनकुळे यांनी भाजपा २४० जागा लढविणार असल्याचे वक्तव्य केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *