Breaking News

सुनिल तटकरे यांची घोषणा, “घड्याळ तेच वेळ नवी”, निर्धार नवपर्वाचा राज्यव्यापी दौरा ५ नोव्हेंबरपासून...

‘घड्याळ तेच वेळ नवी… या टॅगलाईनखाली ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्‍याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सुनिल तटकरे म्हणाले, दिनांक ५ नोव्हेंबरपासून पक्षाचा सुरू होणारा हा राज्यव्यापी दौरा पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यात जाणार आहे. यामध्ये ‘निर्धार नवपर्वाचा, कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांसोबत मेळावा’ घेतला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या उत्तरदायित्व सभांना आम्हाला कसा प्रतिसाद मिळाला हे तुम्ही पाहिलेच आहेत. महाराष्ट्रातील जनता अजितदादांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवत आणखी व्यापक जनाधार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि एनडीएचा वाढविण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणूका लक्षात घेता येत्या १५ डिसेंबरपर्यंत ‘निर्धार नवपर्वाचा’ ही भूमिका घेऊन ‘घड्याळ तेच वेळ नवी’ या टॅगलाईनद्वारे संबंध महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच सुनिल तटकरे म्हणाले, हा दौरा संघटनेचा असून प्रदेशाध्यक्ष म्हणून हा दौरा आहे. अजितदादांचा दौरा हा प्रशासकीय असेल त्यात आमचे आमदार, दुसऱ्या पक्षाचे आमदार असा भेद नसेल असेही प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

एनडीए म्हणून आम्ही तयारी करत आहोत. घड्याळ चिन्हावर आम्ही निवडणुक लढणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट करत दिनांक ५ ते ७ नोव्हेंबर पूर्व विदर्भात दौरा केल्यानंतर दिनांक ९ नोव्हेंबरला निवडणुक आयोगाच्या तारखेसाठी दिल्लीत जाणार आहे. कोणाला वाटेल अदृष्यशक्ती काम करतेय तर तसे नाही. आमच्या पक्षाची बाजू आम्ही मांडतो असा टोलाही लगावला.

राष्ट्रवादी पक्ष म्हणून माझीही हीच इच्छा आहे. मीसुद्धा पत्र दिले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा फौजिया खान यांच्याविरोधात याचिका केली आहे. आम्हीसुद्धा लोकशाही अबाधित रहावी म्हणून दाखल केले आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले.

सरकार तत्परतेने मराठा आरक्षण देण्यासंदर्भात पाऊले उचलत आहेत. या सर्व आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच आभार मानले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नाला सुनिल तटकरे यांनी उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *