Breaking News

भुजबळांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांची स्पष्टोक्ती, सध्या वाचाळवीर वाढलेत

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोराची शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि ओबीसी संघटनांचा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यातच छगन भुजबळ हे सरकारचा भाग असूनही नेमकी सरकारच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतात यावरून या आरक्षणावरून जनता संभ्रमात ठेवण्याचे षडयंत्र आखण्यात येत आहे.

यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ती भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्ट करत छगन भुजबळ यांचे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असून पक्ष सहमत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सध्या पुणे दौऱ्यावर आलेले पुण्याचे पालकमंत्री तथा गटाचे अध्यक्ष अजित पवार यांना विचारले असता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली असल्याचा टोला भुजबळ यांचे नाव न घेता लगावला.

तसेच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत सुनिल तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत अजित पवार यांची भूमिका काय ? असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले की, ३० आणि १ तारखेला कर्जत येथे पक्षाचे शिबीर आयोजित केले आहे. तेथे मी माझी भूमिका स्पष्ट करेन असे सांगत माझं स्पष्ट मत आहे की, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो किंवा राजकिय नसलेले नेते असतील त्यांनी अशी वक्तव्ये करणे टाळावीत जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा शहाजोगपणाचा सल्ला देत याबाबतची खबरदारी सर्वांनी घ्यावी ही काळाची गरज आहे असे मतही व्यक्त केले.

दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुतीचे सरकार अस्थिर असल्याची टीका करत हे सरकार आणखी फार काळ राहणार नसल्याचे भाकित केले.

त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, २४० आमदारांचा पाठिंबा असलेले सरकार कधी अस्थिर असते का असा प्रतिप्रश्न करत काही जण जाणीवपूर्वक अशी विधान करतात असे उपरोधिक टीका केली.

तसेच अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात अमित शाह यांच्या भेटीबाबत विचारले असता, मी काय कोणी राजकिय आजार आणायला आयरा-गैरा पुढारी आहे का मला त्याची गरजही नाही. मला डेंग्यु झाला होता. डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितला होता. त्यामुळे मी थोडे दिवस बाजूला होतो. तसेच अमित शाहंकडे तक्रार करण्यासाठीच आपण दिल्ली दौऱ्यावर गेला होतात का असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले, मी तक्रार करणाऱ्यातील राजकिय व्यक्ती नाही.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *