Breaking News

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी अपवाद राहील, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवरील हल्ल्यात हमासच्या सैनिकांनी पॅराग्लॉडर्सचा वार करत अनेक इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार केला. त्या पार्श्वभूमीवर भारतातही काही व्यावसायिकांनी हौशी पर्यटकांसाठी पॅराग्लॉयडर्सचा वापर सुरु केला. याचा अनुभव काही राजकिय नेत्यांनी आणि मध्यमवर्गीय पर्यटकांनीही घेतल्याचे काही व्हिडिओही व्हायरल केले. ड्रोनचा वापरही भारतात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यास अद्याप गृहमंत्रालयाने परवानगी दिली नाही. इस्त्रायल प्रमाणे भारतावरही अशा स्वरूपाचे हल्ले होऊ शकतात अशी गृहीत धरून या चारही हवाई पद्धतीच्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला.

Check Also

मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा २०, २१ फेब्रुवारीला

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *