Breaking News

शरद पवार यांच्यावर समाज माध्यमातून टीका करणाऱ्याला भाजपाकडून पायघड्या भाजपाच्या मिडीया सेलच्या सहसंयोजक पदावर नियुक्ती

काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरे यांने समाजमाध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत पण सूचक शब्दात टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून निखिल भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांकडून पवार कुटुंबियांची जाहिर माफी मागितली. त्यानंतर भामरे यास जामिनही मंजूर करण्यात आला. मात्र या गोष्टीचा राजकिय फायदा उठविण्यासाठी भाजपाने नुकतीच राज्य कार्यकारणी जाहिर केली असूबन निखिल भामरे यांची भाजपाच्या मिडिया सहसंयोजक पदावर नियुक्ती केली आहे. याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निखिल भामरे यांच्या नियुक्ती करण्याची माहिती उघ़डकीस आणली.

 

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील आहे. त्याने गेल्यावर्षी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.” निखिल भामरेच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. निखिल भामरे याच्यावर राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर निखिल भामरे जवळपास महिनाभर तुरुंगात होता.

 

मात्र, आता त्याच निखिल भामरे याला भाजपाकडून मीडिया सेलचे सहसंयोजक पद देण्यात आले आहे. या सगळ्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्या निखिल भामरेला अधिकृत पद दिल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

 

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथे राहणारा आहे. दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे तो बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर निखिल भामरे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. जे कठीण काळात भक्कमपणे पाठीशी उभे राहीले, त्या देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. दिंडोरी (नाशिक) पासून ते ठाणे, पुण्यापासून ते वर्तकनगर ते मावळ पर्यंत ते शेवटी मुंबई उच्च न्यायालयात माझ्या या केस मध्ये न्यायालयात माझी बाजू भक्कमपणे मांडत या केसला लढ्याचं रूप देणाऱ्या लिगल टिमच्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद, असे ट्विट निखिल भामरे याने केले होते.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *