Breaking News

मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेच्या ऑल इंडियात रँकिंगमध्ये ८ वा प्रतिक प्रकाश इंदलकर यांच्या यशाने कौतुकाचा वर्षाव

युपीएसी परिक्षेच्या आयएएसचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यानंतर आज आयएफएस अर्थात केंद्रीय वन विभागाच्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला. परिक्षेत साताऱ्याचे प्रतिक प्रकाश इंदलकर हे उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे प्रतिक प्रकाश इंदलकर हे आयएफएस परिक्षेत ऑल इंडिया रँकिंग मध्ये ८ वा क्रमांक आला आहे.

आयएफएस होण्यासाठी प्रतिक इंदरकर यांनी यापूर्वी दोन वेळा प्रयत्न केला. यापूर्वी त्यांनी युपीएससीच्या अंतिम मुलाखती पर्यंत धडक मारली होती. मात्र मार्क कमी मिळाल्याने त्यांना यशाने हुलकावणी दिली. परंतु तिसऱ्या प्रयत्नात प्रतिक इंदलकर यांनी यश मिळविलेच. प्रतिकने नुसतेच यश मिळवले नाही तर ऑल इंडिया रँकिंग मध्ये ८ वा क्रमांक मिळविला.

प्रतिक इंदलकर यांचे वडील मंत्रालयातील उपसचिव प्रकाश इंदलकर हे उपसचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नी नेरूळ येथील माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. प्रतिक मिळविलेल्या यशाने त्यांच्यावर सर्वचस्तरातून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *