Breaking News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे.

राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता चार टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह हा भत्ता जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *