Breaking News

राज ठाकरे यांचे आवाहन, रायगडवाल्यांनो जमिनी संभाळा अन्यथा…

राज ठाकरे यांनी आज रायगड येथील मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेत जमिनी संभाळा अन्यथा येथील मराठीची भाषणा जाऊन हिंदी आणि गुजराती भाषेचा वापर सुरु होईल आणि ती भाषा तुम्हालाही शिकावी लागणार असल्याची भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या बैठकीत स्थानिक शेतकऱ्यांना केले.

तत्पूर्वी जमिन परिषदेच्या निमित्ताने कोकणातील रेवस रेड्डी येथे आलेल्या राज ठाकरे यांनी नाना धर्माधिकारी यांची भेट घेत दलालांच्या तावडीतून ठाणे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी त्यांच्या भक्त समुदांयाचा संच वापरावा अशी मागणीही केली. यावेळी नाना धर्माधिकारी आणि राज ठाकरे यांनी एकमेकांचा सत्कार करत आगामी जमिन परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहनही केले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, इथल्या जमिनी परप्रांतीयांना आणि इतर दलालांना विकू नका असे सांगत या सगळ्या जमिनीवर एखादा मराठी माणूस उद्योजक स्वतःचे उद्योग निर्माण करत असेल तर त्या मराठी उद्योगकाला उभे राहण्यासाठी मदत करावी असे आवाहनही केले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काही वर्षापूर्वी नाणारच्या प्रकल्पावरून काय झाले ते आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यावेळी अनेक दलाल आणि जमिनीचे खरेदीदार हे परप्रांतीय असल्याचे दिसून आले. तसेच हे सगळे फ्रंटल म्हणून काम करत असतात मात्र त्यांच्या मागे तेच लोक असतात असा सूचक आरोपही केला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, दलाल आणि परप्रांतियांपासून जमिन मालकांनी सावध रहावे आणि असे आवाहन करत जर कोणी दलाल तुमच्या अथवा परप्रांतीय व्यक्ती तुमच्या जमिन खरेदीसाठी आला असल्यास आणि त्यांच्याकडून दबाव तंत्रास सुरुवात केली असेल तर तुम्ही फोनवरून माझ्याशी एसएमएसवरून तक्रार करू शकता. त्यानंतर मी तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधून तुमची अडचण सोडविण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगत जर तुमची जमिन हातची गेली तर तुमचे नागरिकत्व धोक्यात येणार असल्याचा इशाराही उपस्थित मनसैनिकांना दिला.

या निमित्ताने मुंबई गोवा एक्सप्रेसवे आतापर्यंत पूर्ण झाला नाही. तसेच हा एक्सप्रेस वेच्या दुरुस्ती आणि पूर्णते साठी आता पर्यंत १५ हजार कोटी रूपये राज्य आणि केंद्र सरकारने खर्च केल्याचा आरोप करत हे पैसे गेले कुठे असा सवालही राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनप्रकरणी सरकारला निर्देश

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *