Breaking News

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात टाकला म्हणून १० हजाराचा दंड कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

ऐतिहासिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे टॅक्सीने येवून समुद्रात कचरा टाकल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. याबाबत त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशही प्राप्त झाले होते. कुलाबा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर पोलीसांनी कारवाई करीत दंड ठोठाविला.

गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात कचरा टाकण्याविषयी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे वृत्त प्रसारीत झाले होते. याबाबत पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची टॅक्सी क्रमांक एम एच ०१ एटी ६७२० सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधून काढली. टॅक्सीचा चालक मोहम्मद याकुब अहमद दुधवाला (वय ६२ ) रा. राठी पिर इनायत शहा दर्गा, डोंगरी, मुंबई याला कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सदर इसमावर महानगरपालिकेच्या अधिनियमांनुसार १० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. कुलाबा पोलीस ठाणे येथे सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली, असे गृह विभागाने कळविले आहे. अशा प्रकारे समुद्रात कचरा टाकणे एक दंडनीय गुन्हा असल्याने समुद्रात कुणीही कचरा टाकू नये, असे आवाहनही गृह विभागाने केले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *