Breaking News

अखेर औषधी व यंत्रसामुग्री खरेदी प्राधिकरणाला मिळाला सीईओ लहू माळी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शासकिय रूग्णालयातील रूग्णांच्या पुरेशा औषधामुळे मृत्यू झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने औषधी आणि सामुग्री प्राधिकरणाच्या सीईओ पदी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तब्बल चार महिन्यानंतर या प्राधिकरणाच्या सीईओ पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सनदी अधिकारी लहू माळी यांची नियुक्ती केली असून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची गृह विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली.

राज्य सरकारच्या रुग्णालयासाठी आजपर्यंत हाफकिन या राज्य सरकारच्या महामंडळाकडून औषधी आणि यंत्र सामुग्री खरेदी केली जात होती. मात्र हाफकिनचा ढासळलेला कारभार आणि मोठ्या प्रमाणात अनियमितता यामुळे रुग्णालयांना औषधे वेळेवर मिळत नसल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना खाजगी मेडिकल मधून औषधांची खरेदी करावी लागत होती. त्यामुळे राज्य सरकारने विशेष निर्णय घेऊन मनपा, सार्वजनिक आयोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात आवश्यक सर्व औषधी आणि यंत्र सामूग्री सदर नव्या प्राधिकरणाकडून खरेदी केली जाणार आहे. सदर प्राधिकरण हे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत राहणार असून या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर कार्यकारी कमिटीचे सचिव हे मुख्य सचिव असणार आहे.

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *