Breaking News

कच्चे तेल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स घटवला डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅकल कमी करून ९.०५० रुपये प्रति टन केले. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी संपलेल्या १५ दिवसांच्या आढाव्यात, देशातील क्रूडवरील अनपेक्षित विंडफॉल कर १२,२०० रुपये प्रति टन करण्यात आला होता.

डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी
याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५ रुपये प्रति लिटरवरून ४ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. हे नवे दर १८ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याआधी १५ सप्टेंबरलाही सरकारने ते ६७०० रुपये प्रति टनावरून १०,१०० रुपये प्रति लिटर केले होते. त्याचप्रमाणे विमान इंधन एटीएफवरील शुल्क २.५ रुपये प्रति लिटरवरून १ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क पूर्वीप्रमाणे शून्य राहील.

मागील आढाव्यात सरकारने डिझेल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५.५० रुपयांवरून ५ रुपये प्रति लिटर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील विंडफॉल टॅक्स ३.५० रुपयांवरून २.५० रुपये करण्यात आला आहे.

विंडफॉल कर कधी लागू
देशात प्रथमच १ जुलै २०२२ रोजी या पेट्रोलियम उत्पादनांवर विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता, ज्याद्वारे सरकारने तेल कंपन्यांनी केलेल्या नफ्यावर नफा मिळविण्याचा निर्णय घेतला होता. तेल कंपन्यांच्या नफ्यावर सरकार विंडफॉल टॅक्स लावते. देशांतर्गत नफा कमावण्यासाठी तेल कंपन्या भारताऐवजी परदेशात तेल विकणे टाळतात. याला आळा घालण्यासाठी विंडफॉल टॅक्स लावला जातो..सरकार साधारणपणे दर १५ दिवसांनी विंडफॉल कराचा आढावा घेते.

Check Also

आर्थिक सर्व्हेक्षणानंतर अर्थसंकल्पातील कर प्रणालीवरून उद्योग जगतात उत्सुकता अनेक नवे नियम शेअर बाजारापासून उत्पन्न करातही वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ जवळ येत असताना, दलाल स्ट्रीट इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह बाजारांवर परिणाम करू शकणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *