Breaking News

कर बचत एफडीवर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीसाठी अवघे सहा महिने शिल्लक

गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कर वाचवायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन हुशारीने गुंतवणूक करा. गुंतवणूक पर्यायांमध्ये पीपीएफ, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम या योजना आहेत. मात्र तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करू शकता.

कर बचत एफडी
गुंतवणूकदार इंडसइंड बँक आणि येस बँकेच्या कर बचत एफडीमध्ये गुंतवणूक करून ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता. या बँका सर्वोत्तम व्याजदर देत आहेत. दोन्ही बँकांच्या एफडीमध्ये गुंतवलेली १.५ लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांत २.१५ लाख रुपये होईल.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक कर बचत एफडीमध्ये ६.७ टक्के व्याज देत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील १.५ लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांत २.०९ लाख रुपये होईल. फेडरल बँक कर बचत एफडीवर ६.६ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. येथे गुंतवलेली १.५ लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांत २.०८ लाख रुपये होईल.

एसबीआय
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा कर बचत एफडीवर ६.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. याशिवाय पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँकही ६.५ टक्के व्याज देत आहेत. या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवलेली १.५ लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांत २.०७ लाख रुपये होईल.

एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक कर बचत एफडीवर ७ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. येथे गुंतवलेली १.५ लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांत २.१२ लाख रुपये होईल.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार…

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *