Breaking News

वित्तीय तूटीच्या अाकडेवारीनंतर बाजार कोसळला सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला

मुंबई . गुरूवारी सलग तिसर्या दिवशी देशातील शेअर बाजार घसरून बंद झाले. दुपारनंतर वित्तीय तूटीची अाकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारातील घसऱण अाणखी वाढली. बँक, वाहन, वित्तीय सेवा, अायटी, धातू, औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 453 अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही 135 अंकांची मोठी घसरण नोंदवली.
चालू अार्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांमध्येच वित्तीय तूटीचे लक्ष्य 96 टक्क्यांवर पोचल्याने सेन्सेक्स 453 अंकांनी घसरून 33 हजार 149 वर बंद झाला. तर निफ्टी135 अंकांची घट नोंदवत 10 हजार 227 वर स्थिरावला. गुरूवारी फक्त निफ्टी रियल्टी इंडेक्स तेजीत राहिला.

निफ्टीतील 39 शेअर्स घसरले
कमजोरीने सुरूवात झालेल्या निफ्टीतील 30 शेअर्स घसरून बंद झाले. तर 11 शेअर्स वधारले. सर्वात जास्त घसरण युपीएलच्या शेअर्समध्ये 3.36 टक्के झाली. तर हिंदाल्को, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अरविंदो फार्मा, विप्रो, एसबीअाय, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, ल्युपिन, टाटा मोटर्स, अायसीअायसीय बँक अादी शेअर्स जवळपास तीन टक्क्यांनी घसरले. तर गेल, बाॅश लिमिटेड, बजाज ऑटो, एनटीपीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम, डॉ रेड्डीज, एलएंडटी, अंबुजा सीमेंट, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, भारती एयरटेल अाणि भारती इंफ्राटेल अादी शेअर्स 1 टक्क्यांनी वधारले.

गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी बुडाले
गुरूवारी झालेल्या मोठ्या घसरणीत गुंतवणूकदारांना जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसला अाहे. बुधवारी बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजार भागभांडवल 1,47,04,587.54 कोटी रुपये होते. ते गुरूवारी 107931.54 कोटी रुपयांनी घसरून 1,45,96,656 कोटी रुपयांवर अाले.

सरकारी बँकांसह खासगी बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे गुरूवारी बँक निफ्टी निर्देशांक 500 पेक्षा अधिक अंकांनी घसरला. पीएनबी, एसबीआय, कोटक बँक, अॅक्सिस बँक, अायसीअायसीअाय बँक, य़ेस बँक, अायडीएफसी बँक, फेडरल बँक, कॅनरा बैंक, बँकऑफ बड़ौदा, एचडीएफसी बँक और इंडसइंडस बँक अादी शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *