Breaking News

एप्रिल-ऑगस्टमध्ये भारतातून मोबाईलची निर्यात ४७ हजार कोटींवर ४ हजार कोटींचे मोबाईल केले निर्यात

चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत भारतातून मोबाईल फोनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ४५,७०० कोटी रुपये) झाली आहे. मोबाईल उद्योग संघटना इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने ही माहिती दिली. ICEA ने सांगितले की, एप्रिल-ऑगस्ट २०२३ मध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात सुमारे ३ अब्ज डॉलर (४,८५० कोटी रुपये) होती.

२३,००० कोटींचे आयफोन निर्यात
टेक कंपनी अॅपलने २३,००० कोटी रुपयांचे आयफोन निर्यात केले, जे एकूण निर्यातीच्या निम्म्याहून थोडे अधिक आहे. मात्र, यासंदर्भात अॅपलकडून विचारणा केली असता कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एकूण मोबाईल फोन निर्यातीबाबत, ICEA चेअरमन पंकज मोहिंद्रू म्हणाले की, भारतातून मोबाईल फोन निर्यातीत ८० टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली आहे. भारत GVC (ग्लोबल व्हॅल्यू चेन्स) साठी पसंतीचे ठिकाण बनण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. यावर काम सुरू असून प्रतिसाद सकारात्मक आहे.”

१ लाख कोटी रुपयांच्या उपकरणांची निर्यात अपेक्षित
ICEA च्या अंदाजानुसार, भारतातून फोनची निर्यात ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे ११.१२ अब्ज डॉलर झाली, जी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४५,००० कोटी रुपये होती. मोबाईल फोन कंपन्या यावर्षी १ लाख कोटी रुपयांच्या उपकरणांची निर्यात करतील अशी सरकारची अपेक्षा आहे. सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ३०० अब्ज डॉलर
साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १२० अब्ज डॉलर निर्यातीतून येणे अपेक्षित आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोबाईल फोनची निर्यात ५० अब्ज डॉलर ओलांडण्याचा अंदाज आहे.

Check Also

केंद्रीय अर्थसंकल्पात कर कपातीमुळे या वस्तू स्वस्त तर त्या होणार महाग अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली घोषणा

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *