Breaking News
Mahindra-Group

महिंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी सादर केली आपली ग्लोबल पिक अप संकल्पना द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत करत, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पदार्पण करण्यासाठी विचारपूर्वक तयार करण्यात आलेला दृष्टिकोन या संकल्पनेतून दर्शवण्यात आला आहे.

सुबक व मध्यम आकाराच्या पिकअप्सच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ( Mahindra ) ने केप टाउनमधील फ्युचरस्केप येथे पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण समारंभात आपली नवी ग्लोबल पिक अप संकल्पना प्रदर्शित केली. द ग्लोबल पिक अपपासून सुरुवात करून, जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या श्रेणीसह, सध्याच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत करत, नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पदार्पण करण्यासाठी विचारपूर्वक तयार करण्यात आलेला दृष्टिकोन या संकल्पनेतून दर्शवण्यात आला आहे.

अतिशय मजबूत व बहुमुखी, अत्याधुनिक लॅडर फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित द ग्लोबल पिक अपमध्ये बाजारपेठेतील एक सर्वात बहुमुखी व सक्षम पिकअप सादर करण्याचे वचन देण्यात आले आहे. मजबुती, बहुमुखी प्रतिभा आणि क्षमता यावर भर देऊन तयार करण्यात आलेल्या नवीन ग्लोबल पिक अपमध्ये पिकअप तंत्रज्ञान व सुरक्षेच्या आधुनिक मानकांचे पालन करण्यात आले आहे. सुविधा व नावीन्य यांचा मिलाप असलेला अस्सल अनुभव प्रदान करण्याची महिंद्राची वचनबद्धता यामधून दर्शवली जात आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ( Mahindra ) ऑटोमोटिव्ह सेक्टरचे प्रेसिडेंट वीजय नाकरा यांनी सांगितले, “महिंद्राच्या गो-ग्लोबल धोरणामध्ये नवीन ग्लोबल पिक अप हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले हे मजबूत वाहन फक्त बहुमुखी आणि सक्षम नाही तर त्यामध्ये सुरक्षेच्या उच्च मानकांचे देखील पालन करण्यात आले आहे. सध्याच्या बाजारपेठांमध्ये आमचे स्थान मजबूत करण्यासाठी तसेच नव्या सीमा ओलांडण्यासाठी आम्ही द ग्लोबल पिक अपसोबत सज्ज आहोत. अमर्याद जगणे, असीम शोध आणि स्वातंत्र्याचा स्वीकार करण्यासाठी आमचे आमंत्रण यामधून दर्शवण्यात आले आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे  ( Mahindra ) ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे प्रेसिडेंट आर वेलूसामी यांनी सांगितले, “महिंद्राचे ग्लोबल पिक अप मजबूत आणि बहुमुखी अत्याधुनिक लॅडर फ्रेम प्लॅटफॉर्मवर आधारित असून कामगिरी, सुरक्षा, सुविधा आणि प्रचंड क्षमता प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या संकल्पनेची मूल तत्त्वे आधुनिक युगासाठी एक बहुआयामी वाहन तयार करण्यामध्ये आहेत. लेवल-२ एडीएएस, इमर्सिव्ह इन्फोटेन्मेन्ट आणि इतर अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांमुळे यामधील बहुउपयुक्तता व क्षमतेचा मिलाप वाढला आहे. अस्सलपणा दर्शवणारे, अभियांत्रिकी व सुरक्षा वैशिष्ट्ये असलेले, जागतिक ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेले खऱ्या अर्थाने ग्लोबल पिक अप तयार करण्यावर आम्ही भर देत आहोत.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे चीफ डिझाईन ऑफिसर प्रताप बोस यांनी सांगितले, “डिझाईन हा आमच्या यशाचा आधारस्तंभ आहे, यामुळेच आमच्या ओळख तयार झाली आहे आणि जागतिक पातळीवर आमचा स्वीकार केला जाण्याचा मार्ग देखील यातूनच घडत जात आहे. द ग्लोबल पिक अपचे मजबूत, सहज विसंबून राहता येईल असे, सोयूसुविधांनी सुसज्ज असे रूप जगभरात पसंत केले जाते, साहस व नवे शोध घेण्याची इच्छा तीव्र असल्याचे यामधून दिसून येते. सॅटिन-फिनिश टायटॅनियम-गोल्ड पेंट वाहनाचा अतिशय टिकाऊ अत्याधुनिक लॅडर फ्रेम प्लॅटफॉर्म दर्शवतो, या महिंद्रा पिक अपशी निगडित ‘गो फार’ महत्त्वाकांक्षा यामधून दर्शविल्या जात आहेत. बहुउपयुक्तता आणि क्षमता, त्यासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान, जीवनशैलीमधील परिवर्तन दर्शवते.”

Check Also

आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात ८ मे रोजी येणार बाजारात

आधार हाऊसिंग फायनान्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *