Breaking News

आयआरएम एनर्जीचा आयपीओ उघडला इतकी आहे प्राइस बँड

गॅस वितरण कंपनी आयआरएम एनर्जीचा आयपीओ १८ ऑक्टोबरपासून उघडला आहे. आयआरएम एनर्जीचा ५४५.४० कोटींचा आयपीओ २० ऑक्टोबरला बंद होईल. आयपीओसाठी प्राइस बँड ४८०-५०५ रुपये आहे. तर लॉट आकार २९ शेअर्सचा आहे.

आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ४८ रुपये सूटही मिळणार आहे. आयपीओचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के बिगर स्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. शेअर्सचे वाटप २७ ऑक्टोबर रोजी केले जाईल. तर ३१ ऑक्टोबर रोजी शेअर्सचे लिस्टींग होईल.

आयपीओमध्ये कंपनीने १.०८ कोटी नवीन शेअर्स जारी केले आहेत. या शेअर्सद्वारे जमा झालेल्या पैशांपैकी ३०७.२६ कोटी रुपये तामिळनाडूमधील नमक्कल आणि तिरुचिरापल्ली येथील शहर गॅस वितरण नेटवर्कच्या विकासासाठी वापरले जातील.
१३५ कोटी रुपये काही कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील आणि उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.

गेल्या काही आर्थिक वर्षांमध्ये कंपनीचा विस्तार तसेच मजबूत आर्थिक स्थिती यामुळे बहुतेक बाजार विश्लेषकांनी आयपीओला सबस्क्राइब रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांच्या मते, आयआरएम एनर्जी इतर इंधनांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह आणि पर्यावरणास अनुकूल इंधन पुरवते. अशा स्थितीत कंपनीचा वाढीचा दृष्टीकोन अधिक चांगला दिसतो. ब्रोकरेज विश्लेषकांच्या मते, त्याचे मूल्य चांगले दिसते आणि म्हणूनच त्याला दीर्घकालीन सबस्क्राइब रेटिंग देण्यात आले आहे.

Check Also

दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *