Breaking News

ऑक्टोंबरमध्ये ९ बँकांकडून एफडीवर वाढीव व्याजदराची भेट इतके मिळणार व्याज

अनेक बँकांनी ऑक्टोबर महिन्यात एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापर्यंत ९ बँकांनी एफडी व्याजदर बदलले आहेत. सणासुदीच्या काळात आणखी काही बँका एफडीवरी व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्रने ४६-९० दिवसांच्या ठेवींवर १.२५ टक्क्यांनी एफडी दर वाढवला आहे. बँक आता अल्प मुदतीच्या एफडीवर ३.५० टक्के ऐवजी ४.७५ टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक
कॅनरा बँकेने ५ ऑक्टोबरपासून एफडीचे दर सुधारित केले आहेत. आता ते ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक
१ ऑक्टोबरपासून आयडीएफसी फर्स्ट बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्के दर लागू केला आहे.

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने ३ वर्षांसाठी एफडीवरील मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. आता बँका ज्येष्ठ नागरिकांना २ ते ३ वर्षांच्याएफडीवर ७.९ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. तिरंगा प्लस ठेव योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना ३९९ दिवसांच्या एफडीसाठी ७.८ टक्के व्याज देत आहे.

इंडसइंड बँक
इंडसइंड बँक १ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिकांना ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

येस बँक
येस बँक ४ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्क्यांपर्यंत एफडी व्याजदर देत आहे.

कर्नाटक बँक
१ ऑक्टोबरपासून कर्नाटक बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

युनिटी बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने ७०१ दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना ९.४ टक्के व्याज देत आहे. बँकेकडून ७०१ दिवसांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.९५ टक्के व्याज दिले जात आहे.

बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया १ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *