Breaking News

महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना उत्तम, २ वर्षात बंपर परतावा पोस्ट ऑफिसने आणली महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना

भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस देखील महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना राबवत आहे. महिलाही या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत.

तुम्ही देखील एक महिला असाल आणि तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. या पोस्ट ऑफिस योजनेत महिलांना २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करून बंपर परतावा मिळू शकतो. ज्या बचत योजनेबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे महिला सन्मान प्रमाणपत्र. या योजनेत महिला छोटी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात.

महिलांना खात्रीशीर परतावा

महिला सन्मान प्रमाणपत्र पोस्ट ऑफिसमध्ये देखील कार्यरत आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्याने महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळेल.

खाते कोण उघडू शकते?

या योजनेअंतर्गत महिला २ वर्षांसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकतात. दोन वर्षांत गुंतवणुकीवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. यामुळे महिला भविष्यात बचत करून स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेत जमा होणाऱ्या रकमेवरही सरकार करमाफी देत आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रयोजनेत गुंतवणूक केल्यास सर्व महिलांना करसवलत मिळेल. या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीही येथे त्यांचे खाते उघडू शकतात.

२ वर्षात इतके व्याज मिळेल

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, पोस्ट ऑफिस दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.५ टक्के दराने व्याज देईल. उदाहरणार्थ, तुम्ही एकदा २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पहिल्या वर्षी १५,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६,१२५ रुपये नफा मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत ३१,१२५ रुपयांचा लाभ मिळेल.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *