Breaking News

अ‍ॅपलचा आयफोन १५ लॉन्च, ४ मॉडेल्स बाजारात इतकी असेल किंमत

अ‍ॅपलने कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन १५ सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. यावेळी आयफोन १५ चे ४ मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अ‍ॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन ४८MP प्राथमिक कॅमेरा सह लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही फोन यूएसबी टाइप सी-चार्जिंग पोर्ट आणि मोठी बॅटरी देतात.

आयफोन १५ मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले आहे. तर कंपनीने आयफोन १५ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन १४ प्रो मॉडेल्समध्ये दिला होता. फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा ४८MP आहे तर दुसरा २४MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. हा कॅमेरा कमी प्रकाशात चांगले कार्य करतो. समोर तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२MP कॅमेरा मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये दुसऱ्या पिढीची अल्ट्रा-वाइडबँड चिप आहे, त्यामुळे तुम्ही तुमची अ‍ॅपल डिव्हाइसेस सहजपणे शोधू शकता.

अ‍ॅपलने १२ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता कॅलिफोर्नियातील मुख्य कार्यालयातून आपले सर्व नवीनतम मॉडेल आणि उत्पादने लॉन्च केली. लोकांना त्यांच्या सर्व खास वैशिष्ट्यांबद्दल आणि किमतींबद्दल देखील माहिती देण्यात आली. वंडरलस्ट इव्हेंटने लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली. अ‍ॅपल १५ सप्टेंबरपासून वेब देशांमध्ये आयफोन १५ साठी प्री-ऑर्डर घेणे सुरू करेल आणि एक आठवड्यानंतर २२ सप्टेंबरपासून पूर्णपणे विक्रीसाठी उघडेल.
अ‍ॅपलने यावेळी वॉच सीरीज ९ आणि वॉच अल्ट्रा २ देखील सादर केले आहेत. अ‍ॅपलने प्रथमच चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट प्रदान केला आहे. पूर्वी लाइटनिंग पोर्ट उपलब्ध होते.

नवीन आयफोनची किंमत

आयफोन १५

२८ जीबी – ७९,९०० रुपये
२५६ जीबी – ८९,९०० रुपये
५१२ जीबी – १,०९,९०० रुपये

आयफोन १५ प्लस

१२८ जीबी – ८९,९०० रुपये
२५६ जीबी – ९९,९०० रुपये
५१२ GB – १,१९,९०० रुपये

आयफोन १५ प्रो

१२८ GB – १,३४,९०० रुपये
२५६ जीबी – १,४४,९०० रुपये
५१२ जीबी – १,६४,९०० रुपये
१ टीबी – १,८४,९०० रुपये

आयफोन १५ प्रो मॅक्स

२५६ जीबी – १,५९,९०० रुपये
५१२ जीबी – १,७९,९०० रुपये
१ टीबी – १,९९,९०० रुपये

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *