Breaking News

ही कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा मोठे नुकसान होईल बँक आणि कागदपत्रांशी संबधित कामे पूर्ण करा

आता सप्टेंबर महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलतील. यामुळेच सामान्य लोकांना त्यांचे पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक बचतीशी संबंधित अनेक कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागतात. जेणेकरून नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नुकसान होणार नाही. तुम्हाला तुमच्या २,००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपूर्वी बदलून घ्यायच्या आहेत. बचत योजनांमध्ये आधार अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा खाते गोठवले जाईल.

छोट्या योजनांमध्ये आधार कार्ड अपडेट
ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल आणि ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आधारशी संबंधित माहिती द्यावी लागेल. अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तुमची योजना सुरू असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला आधार क्रमांक द्यावा लागेल. तुम्ही असे न केल्यास आधार क्रमांक सबमिट करेपर्यंत तुमचे छोटे बचत खाते गोठवले जाईल.

स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट
एसबीआय वुईकेअर स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रोजी आहे. एसबीआयद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणारी ही विशेष योजना आहे. या योजनेत केवळ ज्येष्ठ नागरिकच सहभागी होऊ शकतात. यामध्ये त्यांना एफडीवर ७.५ टक्के व्याज दिले जात आहे.

आयडीबीआय अमृत महोत्सव एफडी
आयडीबीआय बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची मुदतही ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. अमृत महोत्सव एफडी योजनेअंतर्गत बँक ३७५ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० क्के व्याज दिले जात आहे. तसेच, या योजनेंतर्गत ४४४ दिवसांच्या एफडीसाठी सर्वसामान्यांना ७.१५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याज दिले जात आहे.

२००० रुपयांची नोट
आरबीआयने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. सर्व सामान्य लोकांना या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा किंवा बदलून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुमच्याकडे २००० रुपयांची नोट पडून असल्यास तुम्ही ती बँकेत जमा करू शकता किंवा ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घेऊ शकता.

Check Also

सेवानिवृत्तीच्या काळात या उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना माहित आहेत का? या १० योजनांचा अतिरिक्त उत्पन्नासाठीचे मार्ग

सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढत्या वयानुसार आणि या महागाईच्या काळात चांगले राहणीमान राखण्यासाठी अनावश्यक खर्च टाळणेही आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *