Breaking News

रुद्रा ग्लोबल इन्फ्राकडून बोनस शेअर्स जाहीर २७०.९३ कोटी रूपयांचे बाजार भांडवल

रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने त्यांच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स जाहीर केला आहे. याशिवाय स्टॉक स्प्लिटही जाहीर केले आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्राच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा दिला आहे. हा शेअर्स मल्टीबॅगर ठरला आहे. कंपनीचे बाजार भांडवल २७०.९३ कोटी रुपये आहे.

रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने बोनस इश्यूद्वारे 1:1 च्या प्रमाणात इक्विटी शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, मंडळाने कंपनीच्या १० रुपये दर्शनी मूल्याचा १ इक्विटी शेअर प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या २ इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्ससाठी किंवा स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.

रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स लिमिटेडची स्थापना १९९१ मध्ये झाली. गुजरातमध्ये दरमहा १००० मेट्रिक टन क्षमतेच्या स्टील री-रोलिंग मिलसह ही कंपनी सुरू झाली. कंपनी आता शिप रिसायकलिंग, ऑक्सिजन प्लांट, इंडक्शन फर्नेस आणि री-रोलिंग मिल यासारख्या अनेक व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स दरवर्षी ३ लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त स्टीलचे उत्पादन करते.

Check Also

अमेरिकेने चिनी आयात मालावरील शुल्कात केली वाढ चीनी मालावर अघोषित बंदी?

अनेक चिनी वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय अमेरिकेच्या जो बिडेन सरकारने घेतला आहे. “कोविड-19 साथीच्या आजारानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *