Breaking News

उर्वशीचा आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीने केली ही मागणी उर्वशीचा फोन चोरणाऱ्या व्यक्तीचा मेल म्हणाला की

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचदरम्यान अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही भारत पाक सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होती मात्र यावेळी तिचा अत्यंत महागडा फोन हरवला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. इतकंच नव्हे तर तो फोन शोधून देणाऱ्याला तिने बक्षीससुद्धा जाहीर केलं होतं.

उर्वशीचा हरवलेला हा फोन २४ कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन होता. हा फोन खास ऑर्डर अंतर्गत डिझाइन करण्यात आला होता. आता एका व्यक्तीला उर्वशीचा आयफोन सापडला असून त्याने उर्वशीला ई-मेल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र संबंधित व्यक्तीने तिला फोन परत देण्याच्या बदल्यात एक खास गोष्ट मागितली आहे. उर्वशीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

ज्या व्यक्तीला उर्वशीचा आयफोन सापडला, त्याने ई-मेल करून तिला माहिती दिली. मात्र फोन परत देण्याच्या बदल्यात त्याने अत्यंत खास मागणी केली आहे. ‘माझ्याकडे तुझा फोन आहे. जर तुला परत हवा असेल तर माझ्या भावाला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी मदत कर’, असं संबंधित व्यक्तीने ई-मेलमध्ये लिहिलं आहे. उर्वशीने या मेलचा स्क्रीनशॉट इन्स्टा-स्टोरीमध्ये पोस्ट करत त्यावर ‘थंब्स अप’चा इमोजी पोस्ट केला आहे.

फोन हरवल्यानंतर उर्वशीने ट्विटरवर लिहिलं होतं, ‘अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा फोन हरवल आहे. जर कोणाला हा फोन सापडला तर कृपया माझी मदत करा. मला तातडीने संपर्क करा.’ या ट्विटमध्ये तिने अहमदाबाद स्टेडियम आणि नरेंद्र मोदी स्टेडियम यांना टॅग केलं होतं. यासोबतच तिने पोलीस तक्रारीचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता.

Check Also

शाहरुख ने ज्या चित्रपटाला दिला नकार त्या चित्रपटाने केली ३ हजार कोटीची कमाई किंग खान ने नाकारलेल्या चित्रपटाने गाठली यशाची शिखरे

एखाद्या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त असते की, एखादा चित्रपटसुद्धा नशिबात असलेल्या अभिनेत्याला रोल मिळतो. त्यामुळेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *