Breaking News

‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ही निभावणार भूमिका रोहित शेट्टी दिग्दर्शक सिंघम ३ मध्ये जुनियर श्रॉफची एन्ट्री

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. रोहितचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूक सर्वांसमोर आला होता. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

नुकतच अक्षय कुमारने नवीन एसीपीची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. आणि हा नवा एसीपी दुसरा तिसरा कोणी नसून हा नवीन एसपी टायगर श्रॉफ आहे. आता सिंघम अगेनमध्ये टायगर श्रॉफने एन्ट्री घेतली आहे. तो एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारने पोस्ट शेअर करून ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

अक्षय कुमारने टायगरच्या लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो त्याची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याच्या एका हातात बंदूक आहे. फोटो शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”दूसरी माँ से अपने भाई का स्वागत करता हूं. टाइगर श्रॉफ बतौर एसीपी सत्या.”

टायगर श्रॉफला कॉप युनिव्हर्सचा एक भाग बनताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अक्षयच्या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, ब्लॉकबस्टर लोडिंग. तर दुसऱ्याने लिहिलं, सुपर. तर अजून एकाने लिहिलं, सिंघम पुन्हा… भारी कास्टिंग आहे. 500 कोटी सिंघम अगेन.

Check Also

शाहरुख ने ज्या चित्रपटाला दिला नकार त्या चित्रपटाने केली ३ हजार कोटीची कमाई किंग खान ने नाकारलेल्या चित्रपटाने गाठली यशाची शिखरे

एखाद्या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त असते की, एखादा चित्रपटसुद्धा नशिबात असलेल्या अभिनेत्याला रोल मिळतो. त्यामुळेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *