अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असताना शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. गणपत या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा झाली होती, पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन…
विकास बहल दिग्दर्शित ‘गणपत’ या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा याचा तडका प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘गणपत’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ २.५० कोटी रुपये कमावले आहेत. आता वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.
‘गणपत’ हा टायगरचा आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग-डे कलेक्शन करणारा चित्रपट आहे. यापूर्वीच्या टायगरच्या चित्रपटांचे ओपनिंग-डे कलेक्शन जास्त होते. टायगरच्या ‘हिरोपंती २’ या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई ६. ५० कोटी रुपये होती. तर ‘बागी ३’ या चित्रपटानं १७ कोटींची कमाई केली होती. टायगरचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वॉर’ने पहिल्या दिवशी ५३.३५ कोटींची कमाई केली होती, तर ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ने ओपनिंग-डेला १२.०६ कोटींची कमाई केली होती.