Breaking News

‘लिओ’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड केली ‘इतक्या’ कोटीची कमाई थलापथी विजयचा 'लिओ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, अवघ्या दोन दिवसांत केली इतकी कमाई

१९ (गुरुवार) ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेल्या थलापथी विजयच्या ‘लिओ’ या तमिळ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ हा त्याच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा सर्वात वेगवान चित्रपट ‘जवान’चा विक्रम मोडीत काढला आहे.

पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कामे करणाऱ्या साऊथचा सुपरस्टार थलापथी विजयच्या ‘लिओ’ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. दोन दिवसांत, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमाईचा टप्पा ओलांडला आहे आणि १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार्‍या सर्वात जलद चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.

तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नडमध्ये अशा तीन भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी आगाऊ बुकिंगमुळे ४६.३६ कोटींची कमाई केली आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ६४.८ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने जवळपास निम्म्या म्हणजेच जवळपास ३६.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मात्र, या चित्रपटाने तमिळ आणि तेलुगूमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. याने पहिल्याच दिवशी हिंदीत २. ८ कोटींचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हिंदी भाषेत १.६३ कोटी रुपयांची कमाई केली. येणाऱ्या दिवसात हा चित्रपट बड्या बड्या चित्रपटाच्या कमाईचे रेकॉर्ड मॉडेल अशी शक्यता जात आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *