Breaking News

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंटनेतून आत्महत्या केल्याची माहिती

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्येचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.देसाई यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे. २०००मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि २००३ मध्ये ‘देवदास’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

त्यामुळे ‘हरिश्चंद्र फॅक्टरी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला.

दरम्यान, नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून १८० कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्याची कोणतीच परतफेड केली नसल्याने हे कर्ज व्याजासकट २८० कोटी रूपयांवर पोहोचले. त्यामुळे एडलवाईज कपंनीने देसाई यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून कर्जाची परतफेड करावी असा प्रस्ताव ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिला होता.

त्याआधारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नितीन देसाई यांना नोटीस जारी करण्यात आली, त्यानंतर आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली.  याशिवाय उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याची माहिती पुढे येताच नितीन देसाई यांनी अवघ्या २० तासात शपथविधीचा मंच उभा केल्याची माहिती पुढे आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *