Breaking News

राज्य सरकारवर टीका करताच अभिनेत्रीचा ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक गायब कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही... थेट तेजस्विनी पंडित ने साधला राज्य सरकारवर निशाणा

 

 

मुंबई : सिंधुताई सकपाळ या चित्रपटात सिंधुताई यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला प्रेषक वर्ग निर्माण करणारी मराठी चित्रपट सृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला राज्य सरकार विरोधात भूमिका मांडणे चांगलंच महागात पडलं आहे. एकीकडे टोलचा मुद्धा राज्यात तापत असताना दुसरीकडे काल ट्वीटरच्या माध्यमातून तेजस्विनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस टोलसंदर्भात बोलताना दिसत आहे. या पोस्टनंतर अभिनेत्रीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक काढून टाकण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये आपलं मत मांडलं आहे.

आता ब्लू टिक गेल्यानंतर अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!, माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.

पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, “सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे, हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!” असा आशय देत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना #महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics असे हॅशटॅग वापरत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *