Breaking News
National Film Award 2021

National Film Award 2021 : रॉकेट्री : द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म पुरस्कार

२०२१ या वर्षाचे ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award 2021 )  आज जाहीर झाले. पुरस्कारांच्या घोषणेपूर्वी निवड समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची यादी सादर केली. पुरस्कारांसाठी दाखल प्रवेशिका काळजीपूर्वक तपासल्याबद्दल आणि सर्वोत्तम निवड केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी निवड समितीचे आभार मानले. त्यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, “प्रत्येक श्रेणीतील चित्रपटांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. मी विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज भारत हा चित्रपट निर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. आपल्याकडे जगाचे कंटेंट हब (आशय केंद्र) बनण्याची क्षमता आहे. हा काळ आपला आहे. आज आपल्या चित्रपटाने जगात वेगळी ओळख मिळवली आहे, मग ते बाफ्टा (BAFTA )पुरस्कार असोत, की ऑस्कर पुरस्कार.”

निवड समितीमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माते आणि चित्रपट कर्मीचा समावेश होता.

फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष केतन मेहता, नॉन-फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष वसंत एस साई, सर्वोत्कृष्ट लेखन निवड समितीचे यतींद्र मिश्रा यांनी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा सेखर यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा केली.

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म प्रकारात सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे.

द काश्मीर फाईल्सला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर RRR ला परिपूर्ण मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अल्लू अर्जुनला पुष्पा (द राइज पार्ट I) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी, आणि क्रिती सॅनॉन मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या संयुक्त विजेत्या ठरल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार एकदा काय झालं या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला जाहीर झाला आहे.

निखील महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपट विषयक सर्वोत्तम पुस्तकासाठीचा पुरस्कार रूपा पब्लिकेशनच्या राजीव विजयकर लिखित MUSIC BY LAXMIKANT PYARELAL : THE INCREDIBLY MELODIOUS JOURNEY या इंग्रजी पुस्तकाला घोषित झाला आहे.

नॉन फिचर फिल्म प्रकारात, सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मूल्य असलेला चित्रपट म्हणून, चंद्रकांत कुलकर्णी निर्मित, प्रतिमा जोशी दिग्दर्शित चंद सासें या चित्रपटाला आणि पर्यटन, निर्यात, कलाकुसर आणि उद्योग याचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटांसाठीचा पुरस्कार, हेमंत वर्मा दिग्दर्शित, वारली आर्ट या चित्रपटाला घोषित झाला आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार

संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *