Breaking News

संचालकाविनाच सांस्कृतिक संचालनालयाचे कामकाज चालणार चार महिने झाले तरी संचालक मिळेना

मुंबई : प्रतिनिधी
संस्कृतीचे वैभव असणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक” पद किमान चार महिने तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अनेक योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. सध्या संचालक पदाचा पदभार सह संचालक यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीमती स्वाती काळे ह्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदी रुजू झाल्या. परंतु आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी “पंगा” घेतला. त्यामुळे अवघ्या आठ महिन्यांत त्यांना संचालक पदावरून पायउतार व्हावे लागले. चार महिने वयोवृद्ध लोक कलावंताचे मानधन वेळेत न दिल्याने श्रीमती काळे यांच्यावर माध्यमांनी जोरदार टिका केली होती. परंतु त्यांनी एका खुलाशाच्या माध्यमातून आपल्याच वरिष्ठांचे वाभाडे काढले होते. त्यामुळे हे प्रकरणं सुद्धा त्यांना चांगलेच भोवले होते.म्हणूनच याची गंभीर दखल घेत खात्याने त्यांना सन्मानाने कार्यमुक्त केले.
परंतु त्यांच्या जाण्यानंतर सांस्कृतिक कार्य खात्याने अद्याप नवीन संचालकांचा शोध घेतला नसल्याने संचालनालयाचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे. नवीन संचालक आता थेट विधानसभा निवडणूकीनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लोक कलावंतासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभारी संचालक पदाचा पदभार सध्या सह संचालक यांच्याकडे आहे. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम वेळेत पूर्ण करणे हे सध्याच्या प्रभारी संचालक यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा “येरे माझ्या मागल्या” अशी परिस्थिती संचालनालयाची झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

Check Also

अमित शाह यांचे आवाहन, … राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा

गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *