Breaking News

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर मध्ये उभारणार

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार ठरलेले शाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपरमधील चिराग नगर येथे करण्याच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यासाठी या परिसरातील साडेचार हेक्टरच्या जागेत हे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी बोलताना दिलीप कांबळे यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक म्हाडा, एसआरए आणि शिवशाही पुर्नवसन प्रकल्प यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे स्मारक ९ मजली इमारतीत उभारण्यात येणार आहे. तसेच या स्मारकात एक हजार व्यक्तींचे सभागृह आणि सुसज्ज लायब्ररी उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या दर्शनी भागात पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय मातंग समाजातील नवतरूणांना विविध स्वंयरोजगाराचे धडे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे स्मारक उभारणीस राज्य सरकारकडून लेखानुदान अधिवेशनात निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगत यासाठी पैसा कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

One comment

  1. अजित केसराळीकर

    आण्णाभाऊ साठे स्मारक समिती गढीत झाल्यापासून आजपर्यंत फक्त मुख्यमंत्री व राज्यमंत्री यांचे पोकळ आश्वासन व राज्यमंत्रीदर्जा आसणा-या व्यक्तीचे राज्यभर दौरे यापूढे स्मारक समितीचे कामकाजच होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *