Breaking News

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कार्यालयांवर ईडीची छापेमारी

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पुरोगामी विचारांच्या राजकिय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कृषीविषयक कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून ईडीने ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे रोहित पवार यांनी राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घालत आणि महागाईच्या मुद्यावरून भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढत पुणे ते नागपूर पर्यंतच्या प्रश्नाना आवाज देण्याचे काम केले. स्थानिक पातळीवरही सर्वसामान्य जनता आणि तरूणाईकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाह्यला मिळाले.

ही यात्रा सुरु असतानाच राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार यांनी संघर्ष यात्रेवरून रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच उभ्या आयुष्यात कधी संघर्ष केलाय का असा खोचक सवालही केला होता. त्यानंतर काही कारणास्तव रोहित पवार हे परदेशात गेले असता त्यांच्या बारामती अॅग्रोच्या सर्व कार्यालयांवर ईडी अर्थात आर्थिक सक्तवसुली संचानालयाने आज छापेमारी करत कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *