Breaking News

तिमाहीत नफा घटूनही ऑइलकडून लाभांश जाहीर प्रति शेअर इतका देणार लाभांश

भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल प्रति शेअर ५ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. इंडियन ऑइलने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले.नफा आणि उत्पन्नात घट होऊनही कंपनीने लाभांश जाहीर केला.

इंडियन ऑइलने सप्टेंबर तिमाहीत १२,९६७ कोटी रुपयांचा नफा कमावला. गेल्या तिमाहीत म्हणजेच पहिल्या तिमाहीत कंपनीने १३,७५० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न १.८० लाख कोटी रुपये आहे. तिमाही आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत इंडियन ऑइलचे उत्पन्न १.८० लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या तिमाहीत म्हणजेच पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न १.९७ लाख कोटी रुपये होते.

कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत तिमाही आधारावर २१,३१३ कोटी रुपयांवर घसरला, तर तो १८,४१९ कोटी रुपये अपेक्षित होता. तर शेवटच्या तिमाहीत म्हणजेच पहिल्या तिमाहीत कंपनीचा EBITDA २२,१६४ कोटी रुपये होता. तिमाही आधारावर आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे EBITDA मार्जिन ११.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर शेवटच्या तिमाहीत म्हणजे पहिल्या तिमाहीत, कंपनीचे EBITDA मार्जिन ११.२ टक्के होते.

Check Also

भारत आणि इराण सोबत चाबहर बंदराच्या अनुषंगाने द्विपक्षिय करार १२० कोटी रूपयांची गुंतवणूक भारताकडून इराणमध्ये

भारत आणि इराण यांच्यात सोमवारी चाबहार बंदराच्या कामकाजासंबंधी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीकोनातून इराण आणि भारता दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *