Breaking News

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळणः आमदारांच्या घरांची जाळपोळ तर शिंदे गटाच्या खासदार आमदारांचे राजीनामे

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज सोमवारी सकाळी बैठक झाली. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताच तोडगा निघाला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या मराठा आंदोलकांनी मराठवाड्यातील अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी, तर शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्याचे प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.

तसेच आरक्षण प्रश्नावरून मराठा समाजाच्या या रोषाचा फटका आगामी निवडणूकीत नको या उद्देशाने शिंदे गटाच्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा देत राजीनामा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच भाजपाचे आमदार बीडमधील गेवराई आमदार लक्ष्मण पवार यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला.

दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवार गटाचे बीडमधील माजलगांवचे आमदार प्रकाश सोळंकी यांची गाडी आणि त्यांचा एक महागडा बंगाल्याला आग लावली. तसेच बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असलेल्या ठिकाणीही आंदोलकांनी तोडफोड करून आग लावल्याची माहिती पुढे येत आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घरालाही आग आंदोलकांनी हल्ला करत आग लावली. भाजपाचे आमदार प्रशांत बंब आणि माजी आमदार जयदत्त क्षिरसागर यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली.

तसेच नांदेडचे आमदार अशोक चव्हाण यांच्या घरावरील संभावित हल्ल्याच्या भीतीने त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. तत्पूर्वी काल नांदेडचे भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांच्या गाडीची तोडफोड आणि घराची तोडफोड मराठा आंदोलकांनी केली.

बातमी लिहीपर्यंत काँग्रेसचे आमदार सुरेश परपूडकर यांनीही आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय सोलापूरात पुणे हैद्राबाद रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. याशिवाय कोल्हापूरात गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शॉक ट्रिटमेंट देण्याचे आंदोलन करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *