Breaking News

सहा बँकांचा एफडी गुंतवणूकदारांना झटका ठेवींवरील व्याज दर घटवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दर कायम ठेवू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याआधीच देशातील सहा बँकांनी एफडीचे दर कमी करून ग्राहकांना इटका दिला आहे.

एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. हा बदल २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात करण्यात आला आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर ३ टक्के ते ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. नवीन दर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ इंडियाने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. दुरुस्तीनंतर, बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.७५ टक्के व्याज प्रदान करेल.

इंडसइंड बँक सात दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३.५० टक्के ते ७.८५ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बँक एफडीवर ८.२५ टक्के व्याज देत आहे. नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. तर कर्नाटक बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३.५० टक्के आणि ७.२५ टक्के व्याज देत आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेने २ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. या बदलामुळे बँक ३ ते ७.५० टक्के व्याज देत आहे. हा दर सात दिवस ते १० वर्षांच्या ठेवींवर आहे.

पंजाब अँड सिंध बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीवर २.८० ते ७.४० टक्के व्याज देत आहेत. हे नवे व्याजदर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *