Breaking News

स्वत:वर गोळी झाडून घेत आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांची आत्महत्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली

मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन वर्षापासून कँन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले महाराष्ट्र पोलिस दलातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज शुक्रवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सकाळच्या काळात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमांशू रॉय हे १९८८ च्या बँचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी २०१३ साली मँच फिक्सिंग प्रकरणातील एक आरोपी विंदू दारासिंग याला अटक करण्यापासून दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या गाडीवरील ड्रायव्हर अरिफ बाईलवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जे.डे हत्याप्रकरण, लैला खान डबल मर्डर खटल्यात त्यांनी बजावलेली भूमिका महत्वाची होती.

परंतु दोन वर्षापूर्वी त्यांना कँन्सर सारख्या आजराची लागण झाल्याने उपचारासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केले. त्याचबरोबर परदेशात जावूनही त्यांनी स्वत:वर उपचार करून घेतले. मात्र त्यांच्या आजारात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे हिमांशू रॉय यांनी अखेर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *