Breaking News

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय

तेहरीक ए-पाकिस्तानचे प्रमुख तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखान प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात इम्रान खान यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची संधी आहे. इम्रान खान यांचे वकील तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पोहोचले.
तोशाखान प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तातडीने माजी पंतप्रधान असलेल्या खान यांना अटक करण्याचे आदेश देखील दिले. त्यानंतर इम्रान खान यांना लाहोर येथील जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली. इम्रान खान यांना लाहोरहून इस्लामाबादकडे नेण्यात येणार आहे. ३ वर्षाच्या शिक्षेसोबत इम्रान खान यांच्यावर ५ वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्यावर २०१८ ते २०२२ या काळात पंतप्रधान असताना पदाचा दुरुपयोग करून सरकारी भेट वस्तूंची खरेदी आणि विक्रीसाठी सत्तेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. इम्रान खान यांना परदेशी दौऱ्यावर असताना अनेक भेट वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यांची किंमत १४० मिलियन इतकी होती. पाकिस्तानमध्ये तोशाखान हा एक सरकारी विभाग आहे ज्यात पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना परदेशी दौऱ्यात मिळालेल्या वस्तू ठेवल्या जातात. खान यांनी या भेट वस्तू कमी किंमतीत विकत घेऊन त्या चढ्या किंमतीत विकल्याचा आरोप होता. न्यायालयाने इम्रान खान यांना संपत्ती लपवने आणि सरकारी बेट वस्तू विक्री प्रकरणात दोषी ठरवले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या वकीलांनी कोर्टाचे न्यायाधीश दिलावर हुमायू यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. आता खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानामध्ये पुन्हा एकदा राडा सुरू होणार असे दिसते.

याआधी ९ मार्च रोजी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने भ्रष्ट्राचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाच्या आवारात अटक केली होती. तेव्हा खान यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला होता. आता देखील खान समर्थकांनी यावरून निदर्शने करण्यास सुरुवात केली. तसेच पाकिस्तानमधील न्यायालये लष्कराच्या दबावात काम करत असल्याचा आरोप एका समर्थकाने केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *