Breaking News

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ….त्यांची सवय आहे काहीही बोलण्याची… संजय सिरसाट यांच्यावर प्रियंका चतुर्वेदी अखेर बोलल्या

राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे दावे-प्रतिदाव्यांच्या राजकारणात दोन्ही बाजू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी संध्याकाळी बोलताना प्रियांका चतुर्वेदी व आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर चतुर्वेदींनी केलेल्या टीकेला आता संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे व प्रियांका चतुर्वेदींचा उल्लेख करताना म्हणाले, ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत भयानक वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना त्यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची खासदारकी दिली”, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

दरम्यान, शिरसाट यांच्या या विधानावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझी एखाद्या चरित्रहीन व्यक्तीच्या बाबतीत कोणतंही उत्तर द्यायची इच्छा नाही. मला जे बोलायचं होतं, ते मी ट्विटरवर सांगितलंय. त्यानंतर मला अशा चरित्रहीन व्यक्तीबद्दल बोलाययची गरज नाही. त्यांची सवय आहे कुणाबद्दलही बोलायची. जे स्वत: चरित्रहीन असतात, ते दुसऱ्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात, असं त्या खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाल्या.

जेव्हा चंद्रकांत खैरे लोकसभेला पडले तेव्हा त्यांचं पुनर्वसन करायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आम्ही स्वत: चंद्रकांत खैरेंना घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. यांच्यासाठी काहीतरी करा असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा नक्कीच यांचं पुनर्वसन करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. जेव्हा लोकसभेच्या आणि विधानपरिषदेच्या जागा निघाल्या, तेव्हा आम्ही स्वत: खैरेंचं अभिनंदन केलं आणि सांगितलं की आता खासदारकीला तुम्ही उमेदवार आहात. तसाच सिग्नलही त्यांना देण्यात आला होता. पण ऐनवेळी आदित्य ठाकरेंनी काय कांडी फिरवली माहिती नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.

त्यामुळे हे वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलं आहे. तुम्ही माझ्या तोंडी हे का मारता मला कळत नाही, असंही शिरसाट यावेळी म्हणाले.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *