Breaking News

जितेंद्र आव्हाड म्हणाले, थांबा जरा, टेलिफोन ऑपरेटरने फोन लावायला सुरुवात… विरोधी पक्षनेते पद आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाल्यानंतर दिला सूचक इशारा

अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते. अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज रविवारी सकाळीच अजित पवार त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत राजभवनात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक नेतेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद रिकामे झाले आहे. या पदावर आता जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रतोदपद अनिल पाटील यांच्याकडे होते. अनिल पाटील यांनी अजित पवारांसह बंडखोरी केल्याने त्या पदावरही पुनर्नियुक्ती गरजेची होती. त्यामुळे या पदावरही जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माझ्या भूमिकेवर पवारांचं कायम प्रेम होतं. त्यांच्या प्रेमामुळेच मी भूमिका घेत होतो. शोषितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या चेहऱ्याला साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्यादृष्टीने शरद पवारच राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पक्षनाव आणि निषाणी कोणी घेऊ शकणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्या अर्थी साहेब कारवाई म्हणत आहेत, तोवर सुरू होईल. आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडेच आहेत.माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद जो व्हिप काढेल तोच लागू होईल.

कित्येकांच्या बायका, पोरं, नातेवाईक फोन करत आहेत, आम्ही समजावतो म्हणून. कारण गावात वातावरण खराब व्हायला लागलं आहे. काही गावात उद्रेक सुरू झाला आहे. लोकं सहन नाही करत. लोकं जे परंपरेने शरद पवारांचे विरोधकही असतील ते मान्य करतात की पवारांनी एकहाती मोकळं मैदान दिलं होतं. तुम्ही मंत्री झालात तुम्ही चार आमदार तरी निवडून आणले. त्यांनी आमदार निवडून आणले. आजारपणात सभा घ्यायच्या. माणूस जिवंत असेल तर हृदयाला चिंता बसत असेल की काय करतोय. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घरातून बाहेर काढावं, त्या बापाला काय वाटत असेल हे आपण कथांमध्ये वाचलं आहे. आपण इतके निष्ठूर झालो आहोत की दुःखाची छटा तुमच्या तोंडावर दिसत नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या दिवशी बदलता येत नाही. जो माणूस आहे त्याला विश्वासात घ्यावं लागेल. शेवटी क्रिया, प्रतिक्रिया, संवाद करूनच एकत्रित निर्णय होतो. पक्षाध्यक्ष नेमला आणि काम झालं असं होत नाही.

किती आमदार सोबत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी आमदार आहे ना. थांबा हो. घाई करू नका. शरद पवार पूर्णपणे अॅक्टिव्ह झालेले नाहीत. अजून टेलिफॉन ऑपरेटरने फोन करायला सुरुवात केली नाही. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने आणि जोमाने तयारीला लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, शरद पवारांनी पुन्हा अॅक्टिव्ह होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत झालेली बंडखोरी मोडून काढण्यास पवारांना आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना यश येतंय का ते पाहावं लागेल.

अजित पवारांनी निधीच दिला नाही, असा आरोप करण्यात आला होता. आज तेच शिंदे साहेब अजित दादांचं स्वागत करताना दिसत होते. राजकारणात एका वर्षात एवढा विरोधाभास पाहिला नव्हता. अजित पवारांवर टीका करतच एकनाथ शिंदे बाहेर पडले होते, असंही आव्हाड म्हणाले.

माझ्या भूमिकेवर पवारांचं कायम प्रेम होतं. त्यांच्या प्रेमामुळेच मी भूमिका घेत होतो. शोषितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या चेहऱ्याला साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माझ्यादृष्टीने शरद पवारच राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पक्षनाव आणि निशाणी कोणी घेऊ शकणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्या अर्थी साहेब कारवाई म्हणत आहेत, तोवर लढाई सुरू होईल. आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडेच आहेत. माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद जो व्हिप काढेल तोच लागू होईल, असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *