Breaking News

ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर ..

भारत जोडो यात्रेने आज इतिहास रचला. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणारे दोन माननीय व्यक्तिमत्व, महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे आज भारत जोडो यात्रेत देश वाचवण्याच्या ऐतिहासिक कार्यात एकत्र सहभागी झाले. देशाचे संविधान व लोकशाहीवर हुकुमशाही सरकार घाला घालत असले तरी आम्ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हातात हाथ घालून निघाले आहोत असा  संदेशच गांधी-नेहरू यांनी दिली.
देशात जेव्हा इंग्रज सत्तेची हुकमशाही राजवट जुलुम व अत्याचार करत होती तेंव्हा जनतेचा आवाज बुलंद करत गांधी – नेहरू रस्त्यावर उतरले होते. स्वातंत्र्याच्या  लढ्याचा जाज्वल्य इतिहास आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांनी पुन्हा अनुभवला. राहुल गांधी व तुषार गांधी भाजपाच्या हुकुमशाही राजवटीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करत आज रस्त्यावर उतरले.
एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा द्वेष, हिंसा, दहशत, अन्याय , अत्याचार डोके वर काढील तेव्हा तेव्हा बंधुभाव, अहिंसा, न्याय कायम राखण्यासाठी प्रत्येक युगात गांधी-नेहरू अवरतील आणि फक्त हिंदुस्थानलाच नाही तर संपूर्ण जगाला दिशा दाखवतील…
खिलते रहेंगे फूल चमन में,
अहिंसा-न्याय-भाईचारे के।
क्योंकि आते रहेंगे चमन में,
गांधी-नेहरू इसी बहाने से।।

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *