Breaking News

Tag Archives: prithviraj chavan

चीनी अॅपवर बंदी घातली मात्र नमो अॅपचे काय? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी देशातील १३० कोटी लोकांचे खाजगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत चीनी ५९ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र ज्या नमो Namo अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती परदेशात पाठविली जाते. त्या अॅपवर बंदी कधी घालणार असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. …

Read More »

पावसाळी अधिवेशनात केंद्राने नव्याने पुरवणी अर्थसंकल्प मांडावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

कराड: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीत केंद्र शासनाने १ फेब्रुवारी ला सादर केलेले वार्षिक अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता अंदाजित केलेले राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कर व कराशिवाय महसूल, कर्जाद्वारे उभा करावयाचा निधी तसेच विकास कामांवरील नवीन प्राधान्यक्रम अशा सर्वच आकड्यांचे संदर्भ बदलले …

Read More »

सोने जमा करणे ही जुनीच योजना – भाजपाच्या दोन पंतप्रधानांनी राबविली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

कराड : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना मी काल केली होती. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी केलेली सूचना …

Read More »

कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …

Read More »

असंघटीत कामगारांना ५ हजार: म.फुले आरोग्य योजनेतील रूग्णालयात मोफत कोरोना चाचणी काँग्रेसच्या टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांची चाचणी मोफत करावी, असंघटीत कामगारांना ५ हजाराचा मदतनिधी द्यावा, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज द्यावे, पीपीई किटवरील टॅक्स माफ करावा यासह विविध मागण्या आणि सुधारणांचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या टास्कफोर्सने आज सादर करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी …

Read More »

माजी म्हणाले विद्यमान मुख्यमंत्र्यांना, कर्ज वसूली ६ महिने थांबवा मुख्यमंत्री ठाकरेंकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली पत्राद्वारे मागण्यांची यादी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत यापार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशानुसार नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूलीवर तीन महिन्यासाठी कोणताही हप्ता भरू नये यासाठी सुट देण्यात आली. मात्र ही तीन महिन्याची सूट पुरेशी नसून ही मुदत सहा महिन्यापर्यत वाढविण्यात यावी आणि …

Read More »

काँग्रेसची टास्कफोर्स राज्य सरकारला आभासी मदत करणार कोरोना विरोधी लढाईसाठी COVID-19 टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स व विविध …

Read More »

सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देवू शरद पवार, यशवंत सिन्हा, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांचा निर्धार

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत आहे. जेएनयु (JNU) मध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते. त्यामुळे संपुर्ण देशात विरोध होत आहे. सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले. …

Read More »

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

नागपूरः प्रतिनिधी संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. …

Read More »

काळे कारनामे करून लपून छपून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस काळ्या अक्षरात लिहिला जाईलः खा. अहमद पटेल

मुंबईः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून आज सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. अहमद …

Read More »