Breaking News

Tag Archives: prithviraj chavan

नाना पटोले यांचा टोला, चव्हाण सरकारबदद्ल… तर अजित पवारांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना सत्यपाल मलिकांनी मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयकडून नोटीस

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा …

Read More »

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ‘हे’ ६ ठराव मंजूर करत व्यक्त केला निर्धार भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प: नाना पटोले

राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, …

Read More »

मोदी सरकार घाबरले म्हणूनच ती कारवाई, नाना पटोले यांचा निशाणा कुठे? भाजपा सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर जेल भरो आंदोलन

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले …

Read More »

खत खरेदीवेळी जातीची विचारणाः विरोधकांनी धारेवर धरताच अखेर सरकारची …. अजित पवार आणि नाना पटोले आक्रमक पवित्रा घेतल्या नंतर मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

आधीच नैसर्गिक संकटांमुळे आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या खताची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नावं नोंदवावी लागतात. मात्र नाव नोंदविताना ऑनलाईन पोर्टलवर संबधित शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याची माहिती पुढे आली. याच याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले असून याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप,…वैधतेबाबत शंका असल्यानेच निवडणूका पुढे ढकलतायत शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार आणि विरोधात वातावरण

महाविकास आघाडी एकत्रित निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी आणि जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रयत्नशील आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारत आयोगाच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारला आदेश दिले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर अवैधतेची टांगती तलवार असून शिंदे-फडणवीसांनाही त्यांच्या …

Read More »

नाना पटोले, थोरात, चव्हाण एकत्र येत म्हणाले,… आमच्यात कुठलाही वाद नाही काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा

भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहोचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेचे उमेदवार …

Read More »

नाना पटोले म्हणाले, विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार पुण्यातील कसबा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ, ६ जण इच्छुक, उद्या मविआची बैठक

पिंपरी चिंचवड व पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका, मंगळसूत्र विकून देश चालविण्याची मोंदीवर वेळ मात्र शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराक़े अक्षम्य दुर्लक्ष

कोरोना काळानंतर देशातील सरकार मालकीचे उद्योग विकायला काढण्यात आले असून अनेक उद्योगांची विक्री करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशावरील कर्जाच्या रकमेतही मोंदीच्या काळात झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत म्हणाले की, मोदी सरकारने सर्वाधिक कर्ज …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, जाहिर केल्याप्रमाणे सीमाप्रश्नी विधेयक का आणले नाही? सीमावादावर ठराव आणण्याबाबत विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीसांची माघार

कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका मांडली. मात्र मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीत सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचे ठरले. मात्र दुसरा आठवडा सुरु झाला तरी अद्याप ठराव का आणला जात नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचे …

Read More »

अजित पवार म्हणाले, परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच… केंद्र सरकारच्या मनात असेल तर यातून 'दूध का दूध, पानी का पानी होऊ दे... ट्वीटरवरील बातमीमागे मास्टरमाईंड शोधा...

राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी असे मोर्चे येतात परवानगी दिलेली नाही हे माझ्या ऐकीवात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा अधिकार आहे परवानगी नाकारण्याचा अधिकार त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही मोर्चा काढणारच आहे. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य …

Read More »