Breaking News

Tag Archives: nana patole

नाना पटोले यांचा सवाल, निवडणुकांसाठी भाजपाने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का ? सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर;पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे

भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, …दुसऱ्यांचे पक्ष फोडून पक्ष वाढवण्याचा ‘उद्योग’ राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजपा किंवा बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही.

भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने विधान परिषद, विधानसभा पोटनिवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व …

Read More »

निवडणूकीतील उमेदवारीबाबत काँग्रेसची ही समन्वय समिती घेणार निर्णय प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीची स्थापना..

राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत तर सदस्यांमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. समन्वय समितीत माजी मंत्री …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, मविआची राज्यभर वज्रमुठ…. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले

महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, जेपीसीवर ठाम… जनतेला हिशोब मिळालाच पाहिजे जेपीसीची मागणी देशातील १९ पक्षांची; काँग्रेस आजही जेपीसीवर ठाम

अदानी समुहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचा पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदिय समितीच्या चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह देशातील १९ पक्षांनी जेपीसीची मागणी केली आहे आणि …

Read More »

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ‘हे’ ६ ठराव मंजूर करत व्यक्त केला निर्धार भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प: नाना पटोले

राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, …

Read More »

नाना पटोले यांची माहिती; राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा…आमचंही हिंदूत्व पण ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व आम्ही मानतो

कर्नाटक विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारी वाटपाची दुसरी यादी नुकतीच जाहिर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. आता कर्नाटकासोबतच सहा सभा महाराष्ट्रात घेण्यात येणार असून यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची …

Read More »

अतुल लोंढे यांचे प्रत्युत्तर, जनतेने नाकारलेल्या देशमुखांना प्रसिद्धीसाठी बडबडीची सवय… आशिष देशमुखांचे मानसिक संतुलन बिघडले; उपचाराची गरज

आशिष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. यासंदर्भात …

Read More »

नाना पटोले यांचा संतप्त सवाल, सुरत पाकिस्तानात आहे का? सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक

काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदारांना… काँग्रेसच्या SC,ST,OBC, आदिवासी व अल्पसंख्यांक विभागाचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व …

Read More »