Breaking News

Tag Archives: dadaji bhuse

मुख्यमंत्र्यांचे आदेश, पिक कर्ज मिळत नाही ही तक्रार आली नाही पाहिजे राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा

मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

कृषीमंत्री म्हणाले, फक्त ५ टक्के रक्कम भरा आणि फळबागेचा विमा काढा पुनर्रचित हवामान फळपीक विमा योजना राज्यात राबविण्यास मान्यता दिल्याची कृषीमंत्री भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली आहे. या योजनेत सहभागासाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या केवळ ५ टक्के विमा …

Read More »

शेतकऱ्यानों घाबरू नका, टोळाधाडीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २४ मेच्या सुमारास मध्य …

Read More »

अन्नधान्याची गरज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी आता कृषी क्षेत्रावरच भिस्त राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा: फक्त अंतिम सत्राची परिक्षा होणार १५ जून पूर्वी परिक्षा तर १५ जुलैपूर्वी निकाल- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहिर केला. कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय …

Read More »

बँकानो, शेतकरी थकबाकीदार नाही कर्ज द्या केंद्रामार्फत आरबीआयला विनंती करण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानू नये. तसेच त्यांना खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. कोविडमुळे …

Read More »

कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी खरीप पिकांचे नियोजन करा ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असले तरी त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून यापार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीयस्तरावरील नियोजन …

Read More »

शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंदणी चालू वर्षात १८ हजार कोटी रूपयांचे वाटप

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली असली तरी दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंद करण्याची व्यवस्था राज्य सरकारकडूनच करण्यात आल्याची माहिती आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी २५ …

Read More »

शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक काढणी करण्यासाठी कंबाईंड हार्व्हेस्टींगचा वापर केला होता. यामुळे महाबिज मंडळ व शेतकरी यांना बियाणे पुरविताना अनावधानाने त्यात अगोदर शिल्लक असलेल्या दुसऱ्या सोयाबिन वाणाचे बियाणे मिसळले गेल्याने भेसळ आढळून आली. विद्यापीठांना एकत्रित कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील. याचबरोबर खासगी कंपन्या भेसळयुक्त …

Read More »

३० डिसेंबरला विधानभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या मोकळ्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीच्या अनुषंगाने विधिमंडळाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३० मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये …

Read More »